ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशैक्षणिकसामाजिक

जो देशभक्त आहे तोच आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे – दादासाहेब शेळके यांचे प्रतिपादन

[मागासवर्गीय वस्ती मधील अग्निवीर भारतीय सैन्यत आदित्य धुळे झेप]

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 12 जून) शहरामधील इंदिरा गांधी वार्ड मधील आदित्य दिलीप धुळे या तरुणाने अथांग परिश्रम करून अग्निवीर भारतीय सैन्यत भरती झाला. सहा महिन्याची ट्रेनिंग त्याने महार रेजिमेंट सागर (मध्य प्रदेश) इथे झाली. ट्रेनिंग संपल्यानंतर तो आपल्या गावी म्हणजेच उमरखेड येथे आला.

एका गरीब कुटुंबामध्ये त्याची परभणी झाली आई-वडिलांच्या अथांग परिश्रमाचे फळ त्याला आज मिळाले. मागासवर्गीय वस्ती असलेले इंदिरा गांधी वार्ड, येथील तो पहिला तरुण भारतीय सैन्यात दाखल झालेला आहे.

आपल्या इंदिरा गांधी वार्डातील एक तरुण भारतीय सेनेत निवड झाल्यामुळे भीम टायगर सेना सामाजिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे (मुख्य संपादक जनहित 24 न्यूज चॅनल) यांनी आदित्य दिलीप धुळेकर यांचा इंदिरा नगर मधून भव्य दिव्य अभिनंदन रॅली व स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संविधान रक्षक, फायर ब्रँड वक्ते, अन्याय त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारे दादासाहेब शेळके (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक संदीप ठाकरे, पत्रकार प्रसेनजीत दिवेकर, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना, राष्ट्रपाल सावतकर, जिल्हा संपर्कप्रमुख नांदेड, देवानंद पाईकराव तालुका अध्यक्ष आजाद समाज पार्टी, उमरखेड, राजेसाहेब पंडित (माजी सैनिक) इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संदीप ठाकरे यांनीही आदित्य यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात आदित्य यांचे भरपूर कौतुक केले व असे तरुण अजून समाजात घडले पाहिजे, बाबासाहेबांचा मूळ मंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.जो देशभक्त आहे तोच आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे.

ज्या देशात जन्मला त्या देशाची सेवा करण्यासाठी हा तरुण भारतीय सेना दाखल झाला. असे ठणकावून सांगून पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा दिल्या. आदित्य यांचे आई-वडील सौ. संगीता धुळे आणि पेंटर दिलीप धुळे यांचीही कौतुक यावेळी शेळके यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक भीम शाहीर देवानंद पाईकराव यांनी केले. तर आभार सिध्दार्थ दिवेकर यांनी मानले.

यावेळी मीनाबाई खिल्लारे, बेबीबाई मनवर, मंगलाबाई धुळे, पारबडी ढगे, कविता धुळे,माधव धुळे, दिलीप धुळे, राजेश धुळे, रोहित धुळे, तुषार धुळे, अरविंद धुळे, यश धुळे धम्मदीप काळबांडे, इंदिरा गांधी वार्डमधील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!