अपराधताज्या बातम्यामहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

स.पो.नि. शिवप्रकाश मुळे यांनी तीन गोवंशासह हाडूक भरलेले वाहन पकडले.

[चार लाखाचा मुद्देमाल जप्त]

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)

माहूर शहरातील वार्ड क्रमांक दहा एका घरात कतलीच्या उद्देशाने आणलेले तीन गोवंश आणि हाडूक भरलेले वाहन उभे असल्याची गोपनीय माहिती माहूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. शिवप्रकाश मुळे यांना मिळाल्याने स.पो.नी. शिवप्रकाश मुळे यांनी पोलीस होमगार्ड सह अचानकपणे धाड टाकून तीन गोवंश आणि हडुक भरलेला टेम्पो असा एकूण चार लाख दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केल्याची घटना दि 8 रोजी 12.40 वाजता घडली.

गोपनीय माहिती दाराकडून माहिती मिळाल्याने माहूर पोलिसांची पोलीस ठाण्याचे स.पो.नी. शिवप्रकाश मुळे यांचे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी वार्ड क्रमांक दहा येथे एका घरावर छापा मारला असता

येथे कत्तलीच्या उद्देशाने आणलेले तीन बैल गोवंश आणि त्या घरासमोर महिंद्रा पिकप टेम्पो M H 30 A B 1994 मध्ये सहा क्विंटल गोवंशाची हाडे असलेले जप्त करत गोवंश आणि हाडांनी भरलेला टेम्पो माहूर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला

असून एकूण पाच आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नी. शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ.गजानन चौधरी पो.हे.कॉ. प्रकाश गेडाम पो.हे.कॉ. परमेश्वर कनकावाड गजानन जाधव,

संग्राम पवार ज्ञानेश्वर वेलदोडे नामदेव इंनकर आणि होमगार्ड संजय चव्हाण अरविंद राठोड आकाश गिनगुले अजय राठोड पंकज मुरकुटे उपस्थित होते स.पो.नी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. गजानन चौधरी हे पुढील तपास करत आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!