ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रसन्मान सत्कारसामाजिक

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न

✍🏻समाधान कांबळे श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी)

माहूर (दिनांक 06 जून) गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे उद्घाटक म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या देशव्यापी वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. गणेश कचकलवार यांची उपस्थिती होती.

तर विशेष उपस्थिती म्हणून नांदेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, दादाराव कयापाक, किनवटचे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार, अजय कदम युवासेना तालुका प्रमुख किनवट, विजय सूर्यवंशी, सचिन वैद्य, युवा उद्योजक नैतिक नाईक, यांचे विचार मंचावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून किनवट माहूर दोन्ही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, आणि आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते देशव्यापी YGPS चॅनेलचे लोकार्पण करण्यात आले.

तसेच नांदेड जिल्हा भरातून आलेल्या उपस्थित पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले, तसेच विविध शैक्षणिक संस्था व त्या संस्थेतून अभ्यास करून विविध पदावर विराजमान झालेल्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद कांबळे व सय्यद इसा यांनी केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!