उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रयवतमाळसामाजिक

ढानकी माहुर बससेवा सुरू -भारत मुक्ती मोर्चा च्या मागणीला यश.

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक – मो.9823995466

उमरखेड (दिनांक 25 सप्टेंबर) माहुर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पवित्र शक्तिपीठ आहे.शिवाय येथे विविध धर्मियांची पवित्र प्राचीन प्रार्थनास्थळे,प्राचीन किल्ला, लेण्या आहेत. अशाच उमरखेड आगाराद्वारे माहूर येथे ढानकी मार्गे जाण्यासाठी बस नव्हती.ज्यामुळे ढानकी शहराला लागून असणारी जवळपास पन्नास खेड्या पाड्यातील प्रवाशांना खाजगी व इतर वाहनाने उमरखेड मार्गे लांब पल्ल्याचा आणि वेळेचा प्रवास करीत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.

ही समस्या कळताच भारत मुक्ती मोर्चाद्वारे युवा नेतृत्व इंजि.विद्वानभाऊ केवटे यांच्या नेतृत्वात दिनांक 19/09/2025 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ जिल्हा विभाग नियंत्रक यांना भारत मुक्ती मोर्चा द्वारे मोठ्या संख्येने, उमरखेड आगार व्यवस्थापक यांचे मार्फत कार्यकर्त्याच्या उपस्थित निवेदन देण्यात आले होते.ह्या मार्गाने प्रवासी भाविक,भक्त विद्यार्थी,युवा,शेतकरी,मजूर महिला यांची होणारी तारांबळ लक्षात येताच उमरखेड आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांनी भारत मुक्ती मोर्चाच्या निवेदनाची तत्काळ दखल घेत प्रवाशांच्या सेवेत दिनांक 25/09/2025 रोजी माहूर बस मार्गे ढानकी -फुलसावंगी -महागाव -धनोडा अशी सुरू करण्यात आली.

यावेळी ढानकी शहरात ही गाडी येताच भारत मुक्ती मोर्चा द्वारे हा बसचे वाहक व चालक यांचे शाल आणि श्रीफळ देऊन,यांस बस ला पुष्पहारांचे तोरण बांधून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.पुढे निंगनुर येथे देखील अंकुश राठोड यांसह गावकऱ्यांच्या वतीने हा बस चे स्वागत केले गेले.पहिल्याच दिवशी ही बस प्रवाशांनी पूर्णतः भरल्यामूळे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.ह्या बस प्रवासाचे उद्घाटन भारत मुक्ती मोर्चा चे मिलिंद चिकाटे, दिलीप कलाले यांसह सौरभ मिटकरे यांनी केले.

यावेळी तालुकाध्यक्ष भारत कांबळे,अमोल पाटील,शेख जब्बार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ह्या प्रसंगी भारत मुक्ती मोर्चा चे राजू हणवते, मुनव्वर खान,विक्रम प्रेमिलवाड,माधव वाठोरे,संतोष चंद्रवंशी यांसह माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचे चव्हाण,तसेच पत्रकार संघाचे,दिगंबर बल्लेवार,ब्रम्हानंद मुनेश्वर,शेख इरफान,विनोद गायकवाड,यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रवाशांच्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान केवटे यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.तसेच उमरखेड आगाराचे व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके मॅडम यांचे सर्वत्र आभार व्यक्त केले जात असतानाच ही बस आता कायमस्वरूपी सुरू राहावी अशी आशा देखील त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

ह्यावेळी गजानन सुरोशे,सफदर भाई, कृष्णा पाटील,मुजाहिद, मुनव्वर खान,शिवाजी चंद्रवंशी,संदेश पठाडे,इनायत भाई, बालाजी जाधव यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!