अवैधआर्थिकताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेष

बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत नारळीतील जुगार अड्डा “आनंदवन”

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड (25 सप्टेंबर) उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलिसांच्या हद्दीत दररोज नवनवीन कारनामे उजेडात येत असून पोलिसांची त्रेधा त्रिपिट पहावयास मिळत आहे, नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार पांडुरंग शिंदे अवैद्य धंद्यावर नियंत्रण ठेवतील असे वाटत असतांनाच अवैद्य धंद्यांनी मात्र परिसरात चांगलेच डोके वर काढले आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत नारळी तांड्या लगत मोठ्या दिमाखात जुगार अड्डा जुगार्यांना आपल्याकडे ओढत आहे.

हल्ली जुगार अड्ड्याचा गोरख व्यवसाय ही सामूहिक रित्या मांडला जात आहे. पाच -सहा भागीदार एकत्र येऊन जुगार अड्डा थाटतात आणि मग सुरु होतो सारा खेळ !आता हा मुन्ना कोण ? व याच्या मागचा मास्टर माईंड कोण? असे जनतेकडून चर्चा सुरू आहे.

मुन्ना यांच्यावर पोलीस प्रशासना कडून तत्काळ कार्यवाई होईल का? उमरखेड तालुक्याच्या सीमावर्ती भागातून मोठया प्रमाणात हौशी नारळीत येत असल्याचे समजते. इथं चांगलीच पैस्याची उलाढाल होत आहे. जुगाऱ्यासाठी “आनंद वन “ठरलेल्या या अड्ड्यासाठी बंटी, मुन्ना, मज्जू, कलीम या सह सहाजणांच्या टोळक्याने बिनदिक्कत पणे चालविलेल्या धंद्यामुळे बिटरगाव पोलिसांची मूक संमती चर्चेचा विषय ठरली आहे.

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी व्यक्तिशः लक्ष देऊन यावर आळा घालावा अशी मागणी होत आहे. उमरखेड “उपविभाग “सध्या झोपेचं सोंग घेत असल्याने ते जरुरी आहे. असं बोललं जात आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!