उमरखेडताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळसन्मान सत्कार

डॉ. सुरज विनोद नरसिंग आचार्य पदवीने सन्मानित

✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

पुसद (दिनांक 05 मे) फुलसिंग नाईक महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक सुरज विनोद नरसिंग यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत रसायनशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त झाली.

त्यांच्या संशोधनाचा विषय पार्किया बिंगालँडुलोसा आणि लिविस्टोना चायनेसिस वनस्पती वापरून धातूच्या नॅनो कणांचे संश्लेषण आणि जैविक तपासणी हे संशोधन करण्यासाठी त्याचे मार्गदर्शक अमरावती विभागाचे सहसंचालक डॉ. सुबोध इ.भांडारकर हे होते.

या यशाचे श्रेय ते आपल्या आई-वडिलांना तसेच मित्रमंडळींना देतात. या यशासाठी डॉ.सुरज नरसिंग चे सर्वत्रिकडे कौतुक होत आहेत.

या यशासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष जय भाऊ नाईक, सचिव माजी मंत्री मनोहर नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद वावरे यांनी शुभेच्छा दिल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!