ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिक

मानवत सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश..!

मानवत (प्रविण घागरे)

मानवत थिल सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांमध्ये तब्बल 19 विद्यार्थी यश संपादित करत पात्र ठरले आहेत. पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयामध्ये 1 मे 2025 महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह सत्कार करून गुणगौरव करण्यात आला.

यावेळी पाथरी तालुका शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष विजयकुमारजी कत्रुवार गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख उपस्थिती मध्ये पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक मा.श्री संजयजी लड्डा, विद्यालयाचे शिक्षण सल्लागार मा.श्री प्रवीण बेले,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विश्वभूषण इंगोले, पर्यवेक्षक श्री. विलास शिंदे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विशेष मेहनत घेणारे श्री श्रीपाद दडके यांचा यावेळी विद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह सन्मानित करण्यात आले.

यशस्वी विद्यार्थी आराध्य रामकिशन इक्कर, विराज अमरसिंग शिसोदिया, प्रज्वल पुरुषोत्तम गोलाईत ,अद्विका रुपेश देशपांडे, ईश्वरी तुळशीदास हरगुडे,साई सचिन रणखांब, रेणुका बाळाभाऊ चौधरी, धनश्री तुकाराम साबळे, पृथ्वीराज कैलास करडले, वेदांत विष्णू रणेर,शिवराज ज्ञानेश्वर होगे,

अनुष्का रामा मसुरे, सार्थक दिलीप पाठक, हर्षदीप गौतम साळवे, श्रद्धा अविनाश सोरेकर, श्रेयस सुनील सोनवणे, मुंजाभाऊ अनंतराव कदम, अरिहंत कैलास चौभे, रुपम ओम प्रकाश करपे शिष्यवृत्ती मधील ही यशस्वी वाटचाल शाळेच्या गुणवत्तेचे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. असे मत पालक प्रतिनिधी श्री प्रा.रुपेश देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आपल्या विद्यालयाचा नाव लौकिक वाढवत ठेवणाऱ्या चमकत्या ताऱ्यांना पुढील वाटचाली साठी विद्यालयाच्या वतीने भरभरून शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!