उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकिय

उमरखेड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीची आडवा बैठक

उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून महाविकास आघाडीच्या वतीने सहकार नष्ट करू पाहणाऱ्या महायुतीला परास्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शर्तीने झुंज देतील आणि विजय खेचून आणू असा आशावाद साहेबराव कांबळे यांनी, २८ एप्रिल रोजी स्थानिक संजोग भवन येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केलाआहे.

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उभाटा व घटक पक्षाच्या महाविकास आघाडीने आपली कंबर कसली आहे.

गत पाच वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी, महाविकास आघाडीचा धर्म पाळत आपल्या सहकारी पक्षानां सोबत घेऊन बाजार समितीची निवडणूक लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची आढावा बैठक घेण्यात आली. मागील पाच वर्षाच्या बाजार समितीतील आपल्या सत्ता काळातील केलेल्या कामांचा पाढा वाचण्यात आला होता.

निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने व एक दिलाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. सोबतच निवडणूक जिंकण्याचे कानमंत्र ही देण्यात आलेआहे.

यावेळी मंचावर बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तातू देशमुख, राम देवसरकर, साहेबराव कांबळे, शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, बाळासाहेब चंद्रे, प्रेमराव वानखेडे, अॅड. संतोष जैन राष्ट्रवादीचे राजू भैय्या जयस्वाल, प्रदीप देवसरकर, स्वप्निल कनवाळे, अॅड. मुटकुळे, सतीश नाईक, अजय नरवाडे, अमोल नरवाडे आदी नेते व पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!