डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक संयुक्त जयंती उत्साहात साजरी

✍🏻 समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी)
माहूर:- येथे दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक संयुक्त समिती उत्सव समिती तथा समता सैनिक दल तथा माता रमाई महिला मंडळ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ माहूर तर्फे संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा माहूर शहरात अतिशय उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.


यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक तथा बौद्धभूमी परिसर येथे महाप्रसाद देण्यात आले.

हे मिरवणूक माहूर शहरातून मिरवणूक मार्गे बौद्धभूमी परिसर येथे सांगता झाली यावेळी कर्तव्यदक्ष स.पो.नि. शिवप्रकाश मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला व अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केला. माहूर शहरामध्ये विविध ठिकाणी फटाक्यांचा जल्लोष करण्यात आला.

यावेळी आयोजक तथा नगरसेवक प्रतिनिधी आकाश कांबळे. जगदीश कांबळे.आकाश वानखेडे अर्जुन बेर्डे. राहुल कांबळे. विजय मुजमुले.युवराज गायकवाड कपिल वानखेडे अमोल कांनदे.सुशील पाटील.मिलिंद पंडित बुद्धभूषण कांबळे. रवींद्र कांबळे. धीरज कांबळे. सुमित पंडित कनिष्क वानखेडे या सर्वांनी मिरवणूक यशस्वी करून सर्वांचे आभार मानले.
