उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकियशहरसामाजिक

उमरखेड शहर कडकडीत बंद !

(पहलगाम हामल्याचा सर्व राजकीय पक्षाकडून व सर्व सामाजिक संघटनेकडून निषेध..!)

✍🏻बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड:- (दिनांक 29 एप्रिल) मंगळवार रोजी एक दिवशीय शहरातील बाजारपेठ मार्केट बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले होते.

या बंदला उमरखेड शहरातील सर्व व्यापारी वर्गाने स्वयंस्मृतिने आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून शंभर टक्के बंद ठेऊन बंद पाळण्यात आला.संजय गांधी चौकात येते सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व सर्वसामाजिक संघटनेचे व शहरातील व्यापारी वर्ग व नागरिकांनी एकत्र येत निषेध सभेचे आयोजन केले.

या निषेध सभेत सर्वांनी निषेध व्यक्त केल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या घटनेच्या निषेध नोंदविण्यासाठी भारत सरकारला तात्काळ पाकिस्तान विरोधी कारवाई करण्यासाठी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

या निषेध मोर्चा तर शहरातील सर्व राजकीय पक्ष, सर्व व्यापारी संघटना, सर्वसामाजिक संघटना, गणेश मंडळे, दुर्गा उत्सव मंडळे, शहरातील सर्व उत्सव समित्या, शहरातील सर्व पत्रकार संघटना व इतरही वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सदर बंद मध्ये सहभागी होत पहलगामल्याचा निषेध नोंदविला.

चौकट- पाकिस्तानची अंत्ययात्रा काढत पुतळ्याचे केले दहन ! उमरखेड शहरातील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाग चौक ते संजय गांधी चौक इथपर्यंत पाकिस्तानची अंत्ययात्रा काढत संजय गांधी चौकात पुतळ्याचे. दहन करण्यात आले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!