Uncategorizedउमरखेडउमरखेड तालुक्यातीलमहाराष्ट्रयवतमाळ

चातारी येथे स्नेहमेळावा व गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा संपन्न..,,,

रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी उमरखेड तालुक्यातील चातारी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे तब्बल 31 वर्षानंतर इयत्ता दहावी व बारावी बॅच 1994 ते 1997 चे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा व गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खचकड सर होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून भारती सर,शामसुंदर रोकडे सर, चिंचोलकर सर, बिचेवार सर, पडवाळे सर, एस.डि.कदम सर, जगन्नाथ कदम सर, चव्हाण सर, भास्कर रोकडे सर, मुख्याधापक खोकले सर,विश्वाबंर वानखेडे सर, दिनकर थोरकर सर होते.

प्रथमता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मंचावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

विठ्ठल कुंभलवाड यांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी यांना चॉकलेट कीटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मारोती रामराव माने,डॉ. जयकुमार माने, मारोती बेद्रे,पत्रकार विजय कदम,विठ्ठल कुंभलवाड, बालाजी शामराव माने,दत्तराव माने, भास्कर वाठोरे,बालकीसन पसलंवाड, केरबा वाठोरे,शेख पीरमहम्मद,जगदीश दवणे,परमानंद माने, शेख कयूम, शेख मुन्नाभाई,यांनी विशेष प्रयत्न केलेआहे.

आणि या कार्यक्रमाला जवळ पास ९०% विद्यार्थी विद्यार्थीनी आपल्या परिवारासह उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मारोती माने यांनी केले.सर्वाच्या सहकार्याने स्नेहमेळावा हा सोहळा अगदी आनंदमय वातावरणात पार पडला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!