ताज्या बातम्यायवतमाळशहर

युवा सेनेच्या डफलीच्या आवाजाने उघडले नगरपंचायतचे काम

[अखेर तो निकृष्ट सिमेंट रस्ता डांबरीकरण करण्यात आला.]

✍️ करण भरणे सर (ढाणकी प्रतिनिधी)

ढाणकी (दिनांक २७ एप्रिल) शहरात जाणारा दुसरा मुख्य रस्ता (स्व. अटल बिहारी वाजपेयी मार्ग) हा हा गेली कित्येक वर्षापासून मातीचा रस्ता म्हणून ओळखला जायचा.

नगरपंचायत काळात अलीकडेच अंदाजे सहा सात महिन्यापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले. व तो सिमेंट रस्ता बनविण्यात आला. परंतु हा रस्ता एवढा निकृष्ट दर्जाचा होता की, बनविल्यानंतर महिन्याभरातच सदर रस्त्यावर खड्डे पडले आणि शहरात हा रस्ता पावडर रस्ता म्हणून नावारूपास आला.

या रस्त्यावर उठणाऱ्या धुळयुक्त पावडर मुळे सामान्य जनजीवन हे विस्कळीत झाले. नागरिकांना श्वसनाचे आजार, वेगवेगळ्या आजारांचा सामना सदर रस्त्याच्या धुळीमुळे करावा लागत असे. नेमकी जनसामान्यांची ही समस्या लक्षात घेऊन, ढाणकी येथील रहिवासी युवा सेनेचे संभाजी गोरटकर यांनी सदर रस्त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून, हा मुद्दा लावून धरला. सदर रस्त्या करिता युवासेना व शिवसेना उबाठा तर्फे मछली छोडो आंदोलन असो, बेशरम चे झाड लावण्याचे आंदोलन असो, वेगवेगळी निवेदने देणे असो परंतु यश मिळत नव्हते.


शेवटी दिनांक ९ एप्रिल रोजी युवासेने तर्फे डफडी बजाव आंदोलन पुकारण्यात आले. या डफलीचा आवाज नगरपंचायत प्रशासनाच्या कानी चांगलाच घुमला. यामुळेच आज सदर निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता, डांबरीकरण करण्यात आला.
यामुळे ढाणकीकर अत्यंत समाधानी आहेत. आणि युवासेना, शिवसेना उबाठा गटाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करीत आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!