उक्कलगाव जिल्हा परिषद शाळेत जागतिक योग्य दिन साजरा

मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे
मानवत तालुक्यातील मौ. उक्कलगाव जिल्हा परिषद शाळेत २१ जून रोजी विद्यार्थी, पालक, जेष्ठ नागरिक व केंद्र प्रमुख एन. एल. पवार यांच्या उपस्थितीत जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या योग उपक्रमामध्ये सावरगाव केंद्राचे केंद्र प्रमुख एन. एल. पवार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धुराजीराव उक्कलकर आरोग्य विभागाचे लाडाने, एडके, मुख्याध्यापक शेख शाळेतील शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी अंगणवाडी ताई व आशाताई मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
योग दिनाचे औचित्य साधून शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विलास मिटकरी यांनी गावकरी व विद्यार्थ्यांसमोर योग प्रात्यक्षिके सादर केली व सर्वांना योग उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले.

यावेळी जेष्ठ नागरिक व पालक व शाळेतील शिक्षिका श्रीमती सातपुते, श्रीमती. बिरादार, श्रीमती. माने यांनी विद्यार्थिनी सोबत योग उपक्रमाचा आनंद घेतला तर योग उपक्रम यशस्वी करण्यासाठी, जाधव, योगेश देशमुख, चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिले.
