पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी माहूर उत्स्फूर्तपणे बंद

माहूर (प्रतिनिधी) समाधान कांबळे
जम्मू कश्मीर येथील पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात देशाच्या विविध भागातील निर्दोष अशा पर्यटकांना ईतर अशा २८ पर्यटकांना ठार केले गेले. मृतांमध्ये ६ महाराष्ट्रीयन नागरिकांचा देखील समावेश आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्रासह संपूर्णदेशभरात शोककळा पसरली असून अत्यंत निंदनीय आणिसंतापजनक अशा या दहशतवादी हल्ल्यानंतर जनसामान्यात दहशतवाद्यांच्या विरोधात कमालीचा रोष निर्माण झाला आहे.

शासनाने निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली,निषेधार्थ शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी माहूर बंदची हाक पुकारली असून या बंदमध्ये माहूर बाजारपेठ उत्स्फूर्तपणे प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद पहावयास मिळाला.
जम्मू कश्मीरला पर्यटक म्हणून गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या मदतीने भ्याड हल्ला करून महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पर्यटक त्यांच्या कुटुंबा समोर जात विचारत बंदुकीच्या गोळ्यांचे शिकार केले या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ माहूर मध्ये सर्वपक्षीय निषेध व्यक्त करण्यात आला,

“आपलेच गद्दार” या उक्ती प्रमाणे आपल्याच देशातील काही गद्दारांच्या मदतीने दहशतवाद्यांना मदत करून हल्ला घडवून आणला अशा नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून माहूर मध्ये सर्वच जाती-धर्माच्या व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग घेऊन मार्केट बंद ठेवले आणि सायंकाळी चार वाजता श्रद्धांजली वाहन्यात आले.

यावेळी माहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष स.पो.नी. शिवप्रकाश मुळे यांनी संपूर्ण माहूर मध्ये गस्त ठेवत चोख बंदोबस्त ठेवला.
