कृषी धनताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

शेतमजूर युनियचे ०८ वे तालुका अधिवेशन मानवत येथे संपन्न

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे

मानवत (दिनांक 22 जुलै) शेतमजूर युनियचे ०८ वे तालुका अधिवेशन मानवत येथे २१ जुलै रोजी शहरातील कार्यालयात आयोजित करण्यात आले.

दरम्यान कार्यक्रमात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी मानवत तालुका अध्यक्ष पदी संतोष मगर व सचिव पदी लिंबाजी धनले व सहसचिवपदी मुंजा भाऊ नवघरे व उपाध्यक्ष म्हणून रुख्मिणी शिंदे यांची निवड करण्यात आली.

या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून सि. टू. आयचे रामराजे महाडिक उपस्थित होते या अधिवेश नात मागील तीन वर्षाचा कार्य अहवाल जिल्हाध्यक्ष कॉ. अशोक बुरखुंडे यांनी मांडला यावेळी कार्य अहवाल वर सविस्तर चर्चा करण्यात आली श्रावन बाळ, निराधार योजनेचा लाभार्थ्यांच्या मानधनात पाच हजार रुपये पर्यंत वाढ करण्यात यावी.

असा ठराव करण्यात आला घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात सात लाख रुपये वाढ करण्यात यावे असे ठराव मांडण्यात आले व अधिवेशनचा शेवटी आभार कॉ. लिंबाजी धनले यांनी केले मानले यावेळी मोठया संख्येने शेतकरी, शेतमजूर महिला उपस्थित होत्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!