मानवत नगर पालिकेचे वाचनालय पूर्ववत चालू करण्याची मागणी

✍🏻प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)
मानवत (दिनांक 21 जून) नगर पालिके अंतर्गत साधारणतः ४९ वर्षांपासून सुरु असलेले सार्वजनिक वाचनालय पूर्ववत सुरु करण्याची मागणी नगर पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे क्रांती चौक परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे.

मानवत शहरातील पहिले नगर पालिकावाचनालय क्रांती चौक ज्यांची स्थापना १९७६ ची असून सद्य परिस्थि तीत ते बंद आहे. या वाचनाल यात दररोज ज्येष्ठ नागरिक तरुण, विद्यार्थी यांची वर्तमान पत्र पुस्तके वाचनासाठी रेलचेल होती.
वाचनालय बंद असल्या कारणाने वाचकांचा हिरमोड होत आहे तरी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी वाचनालयात एक कर्मचारी ग्रंथपाल म्हणून नेमणूक करून वाचनालय अद्यावत करून वाचनालयातील मोडकळीस आलेलल्या, टेबल, खुर्ची, पंखे, टीव्ही, पहिल्या प्रमाणेउपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.


या निवेदनावर अॅड. दिनेशकुमार दिगंबर दहे,रामराव नागोराव बारहाते, मोहन रामराव बारहाते, बाबाराव ज्ञानोबा दहे, अनंता दहे,रमेश पालदेवार, व्यंकटेश पालदेवार, लिंबराज करपे,सदाशिव दहे, एकनाथ जोशी , पवन जोशी, अनंता बारहाते, सागर दहे, किरण दहे,भारत कच्छवे ,माधव दहे, सुशील कछवे, दीपक कुलथे, सुहास नाईक, हनुमान टाक, रंजीत दहे, बालाजी पांचाळ, कपिल कच्छवे, अरुण कच्छवे, दत्तात्रय दहे, प्रकाश प्रल्हाद कच्छवे, राजेश्वर लाड, राजेश कच्छवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
