सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयाचा विद्यार्थी आराध्य इक्कर याचे नवोदय प्रवेश पात्रता परीक्षेत यश

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे
मानवत (दिनांक 27 मार्च) सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सेमी इंग्रजी विद्यालयातील आराध्य रामकिशन इक्कर या विद्यार्थ्यांने नवोदय प्रवेश पात्रता परीक्षेत घव घवीत यश संपादिन केले आहे.

तो नवोदय विद्यालयासाठी पात्र झालेला आहे विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागाच्या कोट्यातील मेरीटच्या तुलनेत शहरी भागातील मेरिट अतिशय उच्च स्तरावरती लागले यातून त्याने यश संपादित करणे ही अतुलनीय बाब आहे.

या यशासाठी आराध्य व त्याला मार्गदर्शन करणारे उपक्रमशील स्पर्धा परीक्षा प्रमुख श्रीपाद कांतराव दडके यांचा आराध्यच्या यशात मोलाचा वाटा आहे तसेच त्याचे पालक डॉ. रामकिशन इक्कर व डॉ. अनिता इक्कर यांनी आराध्यच्या शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे देखील मोठे योगदान आहे.
या यशाबद्दल विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

या उत्तुंग यशाबद्दल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मा.श्री. विजयकुमारजी कत्रुवार, उपाध्यक्ष मा. श्री. अनिल रावजी नखाते, कोषाध्यक्ष मा. श्री. रामचंद्ररावजी कत्रुवार, सचिव मा. श्री. बालकिशनजी चांडक, सहसचिव मा. श्री. विजयकुमारजी दलाल, व सर्व ज्येष्ठ सन्माननीय संचालक, विद्यालयाचे शिक्षण सल्लागार तथा प्रशासक मा. श्री. प्रवीणजी बेले, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विश्वभूषण इंगोले, पर्यवेक्षक श्री. विलास शिंदे, यांच्या बरोबर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व सन्माननीय पालक तसेच सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
