मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कृती आराखडा समितीची बैठक संपन्न

मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे
मानवत (दिनांक 27 मार्च) मानवत नगरपरिषद कार्यालयात मानवत शहर कृती आराखडा, टास्क फोर्स समितीची बैठक मुख्याधिकारी तथा प्रशासक कोमल सावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय हे दिनदयाळ जन आजीविका योजना हे नवीन अभियान शहरी दारिद्र्य निर्मूलना साठी राबवत आहे ज्याचा उद्देश व्यावसायिक, सामाजिक आणि निवासी वंचितता दूर करणे आहे. अभियानांतर्गत बहुआयामी धोरण आखले जाणार आहे,
यामध्ये वंचित समुदायाचे संघटन तयार करणे आणि समुदाय संस्थांना बळकट करून उपजीविकेच्या संधी निर्माण करणे तसेच प्रोत्साहन देणे. समूह नेतृत्व मॉडेल सक्षम करणे, वित्तीय समावेशन, सामाजिक पायाभूत सुविधेसाठी सहकार्य निर्माण करणे, सामाजिक सुरक्षा आणि योजनांचा लाभ प्रदान करणे तसेच नवीन उपक्रम आणि सहयोग वाढविणे.
बांधकाम कामगार, वाहतूक कामगार, गिग कामगार, व्यक्तिगत सेवा कामगार, स्वच्छता कामगार आणि घरगुती कामगार, तसेच महिला, वृद्ध, दिव्यांग, स्थलांतरित आणि नागरी गरिबांव्यतिरिक्त इतर उपेक्षित समुदाय, ज्यांना आर्थिक नुकसानी मुळे गरिबीत ढकलले जाण्याचा धोका आहे
अशा वंचित व्यावसायिक गटावर लक्ष केंद्रित करून त्यांना आवश्यक सहाय्य करणे बाबत शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. या बैठकीमध्ये उपस्थित सर्व विभागातील अधिकाऱ्यांना (टास्क फोर्स समितीच्या सदस्यांना) श्रीमती कोमल सावरे, मुख्याधिकारी तथा प्रशासक, तथा अध्यक्ष, टास्क फोर्स समिती, शहर उपजीविका कृती आराखडा यांनी असे सांगितले की नवीन अभियानाची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी, या अभियानांतर्गत नवीन उपक्रमापैकी एक उपक्रम म्हणून शहर उपजीविकाकृती आरा खडा सादर करणे आवश्यक आहे.
वंचित घटकासह नागरी गरिबांसाठी शहरांमध्ये उपजीविकेच्या संधींना प्रोत्साहन देणे आणि वाढ करणे यासाठी हा आराखडा म्हणजे एक धोरणात्मक कृती आराखडा आहे.

तरी सर्व विभागांनी हा आराखडा तयार करताना वेळोवेळी सहकार्याची भूमिका व पुढाकार तसेच नवनवीन कल्पना व युक्त्या सुचवाव्यात. गरीबी हटविण्यासाठी उपजीविकेच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे व अभियानाचे उद्दिष्ट निश्चित होईल यासाठी वेळोवेळी नियोजन व सहकार्य करणे असे आवाहन केले आहे.
समितीच्या बैठकीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी हे पदसिद्ध सदस्य म्हणून उपस्थित होते.

यामध्ये विशेषतः कौशल्य व रोजगार विभाग, जिल्हा कामगार विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिव्यांग विभाग, आरोग्य अधिकारी, पुरवठा अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, समाजकार्य विद्यालयाचे प्रतिनिधी, राष्ट्रीयकृत बँक अधिकारी, शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, औद्यो गिक प्रशिक्षण विभाग, तालुका कृषी अधिकारी, सांख्यिकी विभाग, नियोजन विभाग, महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभाग, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ, विविध संस्था व संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीचे संपूर्ण नियोजन हे विभाग प्रमुख एम.डी.पठाण, व हनुमंत बिडवे यांनी केले.
या बैठकीसाठी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यामध्ये भगवानराव शिंदे, अन्वर सय्यद, महेश कदम, प्रकाश हारकळ, शताणिक जोशी, अजय उडते, संतोष खरात, रामराव चव्हाण, संतोष उन्हाळे, राजेश शर्मा, भारत पवार, संजय रुद्रवार, सचिन सोनवणे, पंकज पवार, मनमोहन बारहाते, रवी दहे इत्यादी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या बैठकीसाठी विशेष परिश्रम रेखा मनेरे व अभिजीत धुमाळ यांनी घेतले.
