आरोग्यउमरखेडताज्या बातम्यायवतमाळशहरसामाजिक

मागासवर्गीय वस्तीतील सार्वजनिक शौचालय त्वरित सुरू करा – नागरिकांची मागणी

🛑 शौचालयाचे उद्घाटन करिता मुख्यमंत्री येणार आहे का? – प्रफुल दिवेकर (शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी,उमरखेड)

🔵 तर जनभावना लक्षात घेऊन आम्हालाचा पुढाकार घेऊन नागरिकांच्या हक्कासाठी शौचालयाचे कुलूप तोडून स्वतःच उद्घाटन करून नागरिकांसाठी सुरू करणार – सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना,उमरखेड)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 27 मार्च) शहरातील मागासवर्गीय वस्तीतील सार्वजनिक पुरुष व महिला शौचालय डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील मागील दीड ते दोन महिन्यापासून सार्वजनिक शौचालयाचे रिपेरिंग दुरुस्तचे काम पूर्ण होऊनही हे शौचालये नागरिकांसाठी खुले करण्यात आले नाही.

सार्वजनिक शौचालय सुरू नसल्यामुळे नागरिकांना उघड्यावर बसण्याची वेळ आलेली आहे.त्यामुळे बौद्ध शमशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांनी संडास करून घाण पसरवली आहे,

त्यामुळे लहान बालकाचे आणि, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दोन महिन्यापासून सार्वजनिक शौचालय का सुरू केले नाही याचे कारण अद्यापही नगरपालिकेने स्पष्ट केलेले नाहीत.

वारंवार शौचालयात सुरू करण्याबाबत विनंती व सूचना केल्या तरीही हे शौचालय सुरू करण्यास नगर पालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहेत.

चौकट:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड, ताजपुरा वार्ड, संत चोखामेळा वार्ड इत्यादी वार्डामधून नागरिक संडास करिता या सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. पण पण उमरखेड नगरपालिका हे शौचालय सुरू करण्यास टाळाटाळ का? करत आहे. या शौचालयाचे उद्घाटन करिता मुख्यमंत्री येणार आहे का? – प्रफुल दिवेकर (शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी,उमरखेड)

चौकट:- मागासवर्गीय वस्तीतील शौचालयात सुरू करण्याबाबत नगरपरिषदला वारंवार विनंती व सूचना केल्या तरीही हे शौचालय सुरू होत नसतील तर जनभावना लक्षात घेऊन आम्हालाचा पुढाकार घेऊन नागरिकांच्या हक्कासाठी शौचालयाचे कुलूप तोडून स्वतःच उद्घाटन करून नागरिकांसाठी सुरू करणार – सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना,उमरखेड)

सदर रिपेरिंग काम हे एका महिन्यात पूर्ण झाली पण एक महिना उलटूनही सदर शौचालय अध्यापही चालू करण्यात आलेले नाहीत.

यावेळी आजूबाजूच्या वार्डातील अनेक महिला व नागरिक यावेळी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!