ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक धार्मिक कुंडाकडे जाणाऱा पांदन रस्ता मोकळा करा!

(शिवसेना शिंदे गट तालुका संघटक विनोद सुर्यवंशी पाटील यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी.).

✍️ समाधान कांबळे (तालुका प्रतिनिधी)

माहूर (दिनांक 25 मार्च) ऐतिहासिक व धार्मिक तिर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या माहुर शहरातील ऐतिहासिक व पौराणिक दृष्ट्या महत्व असलेल्या अतिप्राचीन बाळसमुद्र कुंडासह मस्काईमाता, म्हसोबा मंदिराकडे जाणारा पांदन रस्ता धनदांडग्यां भुमाफियांनी टोलेजंग इमारती बांधून पांदन रस्ता गिळंकृत केला आहे.

त्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून तो रस्ता भाविकांना दर्शनासाठी मोकळा करुन द्यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक विनोद सुर्यवंशी पाटील यांनी तहसीलदार माहुर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एकेकाळी भिषण पाणी टंचाईच्या काळात शहरालगत असलेले बाळसमुद्र कुंड माहुरवासियांची तहाण भागविणारा ऐतिहासिक व पौराणिक दृष्ट्या महत्व असलेल्या बाळसमुद्र कुंडात भाविक श्रध्दा युक्त अंतःकरणाने स्नान करून हिंदू धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मस्काईमाता व म्हसोबा या ग्रामदैवताचे दर्शनासाठी येत असतात.

परंतु या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर धनदांडग्यां भुमाफियांनी सर्व नियम धाब्यावर बसवून पांदन रस्ता गिळंकृत केल्याने भाविकांना दु:खी अंतःकरणाने परत जावे लागत आहे.

ही बाब लक्षात घेऊन पंचायत समितीचे माजी सभापती शरद राठोड यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे सदर अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती त्या अनुषंगाने महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना आदेश दिले व तातडीने कारवाई करुन अहवाल सादर करावा असे निर्देश दिले.

त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी तहसीलदार माहुर यांना कारवाई करण्याबाबत सुचना देउन केलेल्या कारवाईचा अहवाल सात दिवसात सादर करावा असे सुचित केले आहे.

परंतु आजतागायत कुठलीही कारवाई झाली नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक विनोद सुर्यवंशी पाटील यांनी दिनांक 24 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करुन पांदन रस्त्यावर धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून भाविकांना न्याय द्यावा.

अशी मागणी केली असुन कारवाई न झाल्यास तहसिल कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!