जमाअत ए इस्लामी हिंद तर्फे 25 मार्च ला इफ्तार पार्टी चे आयोजन
✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड :- (दिनांक 23 मार्च) सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. यात रोजा (उपवासाला ) अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. आपला देश विविध आस्था आणि धारणाचा देश आहे. सांप्रदायिक सदभावना जोपासण्या साठी सर्व धर्माची माहिती असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व, प्रेम, जातिय सलोखा, वृध्दिगत व्हावा या उद्देशाने जमाअत ए इस्लामी हिंद उमरखेड च्या वतीने दर वर्षी प्रमाणे इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार तथा लेखक नौशाद उस्मान औरंगाबाद उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रम दिनांक 25 मार्च मंगळवार रोजी सायंकाळी 6.30 वाजता ढाणकी रोड, कै . अनंतराव देवसरकर सांस्कृतिक भवन येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष काझी जहीरोद्दीन यांनी एका प्रसिद्धी पत्रका व्दारे केले .
