डॉ. आंबेडकर नगर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी सुमित (भैया) गाडेकर तर उपाध्यक्षपदी ओम भदर्गे; तर स्वागताध्यक्षपदी सुशील भदर्गे यांची निवड…!
✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक २६ फेब्रुवारी) येथील डॉ. आंबेडकर नगरा तील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा कार्यकारिणी संदर्भात नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. बैठकित डॉ. आंबेडकर नगर येथे साजऱ्या होणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली.

दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी मानवत येथील डॉ. आंबेडकर नगर येथे विविध सजीव देखाव्या सह १४ एप्रिल रोजी संविधान निर्माते महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठया उत्सहात व आनंदात साजरी करण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली.

डॉ. आंबेडकर नगर येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा अध्यक्षपदी सुमित (भैय्या) गाडेकर तर उपाध्यक्षपदी ओम (भैया) भदर्गे आणि स्वागताध्यक्षपदी सुशील भदर्गे यांची सर्वाच्या सहकार्याने व सर्वानुमते निवड करण्यात आली तर जयंती उत्सव समितीची उर्वरित कार्यकारिणी ही पुढील प्रमाणे निवडण्यात आली.

यात कोषाध्यक्षपदी समाधान साळवे, सचिवपदी अशोक पारवे, सहसचिव पदी अमोल घनसावंत, कार्याध्यक्षपदी अमोल मगर, स्वागताध्यक्षपदी सुशील भदर्गे, आणि सल्लागार पदी आनंद वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,

निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन तरुण मित्र मंडळाचा वतीने करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बैठकीस डॉ. आंबेडकर येथील समाज बांधव व तरुण मित्र मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते.
