उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकियसामाजिक

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये द्यावे – शिवसेना महिला आघाडी

[दरमहा 2100 रुपयाचे आश्वासन न पाळल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी कडून मुख्यमंत्र्यांना निवेदन]

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 12 मार्च) महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपये दरमहा मानधन देणार असे आश्वासन दिले होते.पण मतदान पदरात पडून घेतले होते.

तरीसुद्धा आजपर्यंत 2100 रुपये महाराष्ट्राच्या कोणत्याच लाडक्या बहिणीला च्या खात्यात आलेले नाहीत.

महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने तो शब्द फिरविला लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग झाल्या असून त्यांना दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण करावी.

लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 2100 रुपये जमा करावे. अशा प्रकारचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमरखेड तालुका महिला आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहे.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका सौ. सुमित्राताई दोडके, शिवसेना महिला आघाडी शहर संघटिका सौ.रेखाताई भरणे(घाळवट), सोनूताई कुरकुटे, मंजुषाताई आळने, विजयाताई शिंदे,अर्चनाताई बर्डे. सीमाताई भगतzरत्‍नाबाई लोमटे. वर्षा वाहुळे इतर महिला भगिनींच्या उपस्थिती निवेदन देण्यात आले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!