ताज्या बातम्यामहाराष्ट्रसन्मान सत्कारसामाजिक

आरडी शिंदे यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या राष्ट्रीय चर्चा सत्रामध्ये शोध निबंध सादर

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)

उमरखेड :- स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड चे उपक्रमशील शिक्षक श्री. आर.डी. शिंदे सर यांचा’लोक संगीत,.. समाज सुधारणा एक दृष्टिक्षेप ‘या विषयावर चा शोध निबंध स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठामध्ये सादर केला आहे.

हे चर्चासत्र 11,व 12 2025 मार्च रोजी विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी संकुलात संगीत विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.

विविध विद्यापीठातील आणि राज्यातील शोधनिबंधकाने आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक, नवीन शिक्षण धोरण2020 राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक श्री. आर.डी.शिंदे सर यांनी सुद्धा आपला शोध निबंध या विद्यापीठाच्या चर्चा सत्रामध्ये सहभाग घेऊन सादर केला आहे.

यामध्ये विविध विद्यापीठातील संगीत तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!