मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकास भरधाव कार ने उडवले
(मानवत येथील राष्ट्रीय महामार्गावरील घटना;अपघातात बालासाहेब झुटे यांचा मृत्यू )

✍️प्रविण घागरे (मानवत/प्रतिनिधी)
मानवत येथे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका एका जेष्ठ नागरिकास भरधाव कार ने उडवल्याची घटना घडली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी कि मानवत येथील मलिकार्जुन मंदिर समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील उड्डाणंपुलावरून परभणीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कार ने ११ मार्च रोजी सकाळी सहा वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास गोलाईत नगर परिसरातील बालासाहेब झुटे हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना,एका कार ने उडवले कार इतकी वेगात होती की,

विद्युत मंडळाच्या खांबाला धडक दिल्याने विद्युत तारा तुटल्या व बालासाहेब झुटे यांना धडक बसताच हवेत उंच उडाल्याने ते बाजूला असलेल्या खड्ड्यात पडले याच धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

११ मार्च रोजी सकाळी मलिकार्जुन मंदिर समोरील राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील उड्डाणपूला वरून परभणीकडे भरधाव वेगात जाणारी कार एम. एच – १४ बी. आर. ८६९० या कारने राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या गोलाईत नगर परिस रातील बालासाहेब झुटे हे नेहमी प्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना.

उडान पुलावरून येणाऱ्या कार ने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते रस्त्याच्या बाजूवरील खड्ड्यात पडले यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला भरधाव वेगात जाणाऱ्या कार ने विद्युत महामंडळाच्या उच्च दाबाच्या खाबांला जोरदार धडक दिल्याने विद्युत तारा तुटल्याने मोठा स्फोट झाला दरम्यान राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या जिजाऊ नगर, गोलाईत, नगर, सर्वेश्वर नगर, परिसरातील एक किमीच्या अंतरावर स्फोटाचा आवाज झाल्याने या परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान विद्युत तारा तुटल्याने या परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

विद्युत मंडळाचे कर्मचारी दुर्गादास उन्हाळे व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्य करून तुटलेल्या विद्युत तारा जोडून विद्युत पुरवठा सुरळीत केला.
