यवतमाळ जिल्हा मुद्रक असोसिएशन चा चतुर्थ वार्षिक स्नेहमिलन सोहळा साजरा
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

यवतमाळ – अभियंता भवन येथे यवतमाळ जिल्हा मुद्रक असोसिएशन चा चतुर्थ वार्षिक स्नेहमिलन सोहळस २०२५ उत्साहात साजरा झाला.

शरदभाऊ उपलेंचवार, यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपरोक्त कार्यक्रमात श्यामभाऊ पत्की, विदर्भ संघटक, महाराष्ट्र मुद्रण परिषद तथा अध्यक्ष, वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशन, वर्धा ‘वर्तमान स्थितीमध्ये संघटनेचे महत्व व फायदे’ या विषयावर मार्गदर्शक केले.

लक्ष्मीकांत पांडे, कोषाध्यक्ष, वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशन, वर्धा यांनी ‘आधुनिक युगात तंत्रज्ञानाचे फायदे’ या विषयावर उपस्थित सदस्यांना मागदर्शन केले.

तसेच अश्विन भारद्वाज, संचालक, सुरज कार्डस्, नागपूर यांनी पण उपस्थितांना मार्गदर्शन केले याप्रसंगी अमोघ वकारे, सचिव, वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशन, वर्धा, श्यामभाऊ लंगडे, जिल्हा प्रतिनिधी, वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशन, वर्धा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक मा. सुहासभाऊ चिद्दरवार, यवतमाळ गौतमभाऊ छल्लाणी यवतमाळ, प्रकाशभाऊ सरोदे आर्णी,नानाजी उरकुडे, राहुलभाऊ साबु, दारव्हा, बसवेश्वर माहुलकर, कळंब. महिला उद्योजक सौ. रुख्माबाई आत्राम, यवतमाळ,श्रीमती अर्चनाताई बोचरे यवतमाळ जेष्ठ कारागीर दिलीप चव्हाण, यवतमाळ, सुधाकर एकोणकर, यवतमाळ यांचा सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष निलंबर लोखंडे यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली.
उमेश कपिले (उपाध्यक्ष) व शरद जावंधिया (कोषाध्यक्ष) यांनी अहवाल सादर केला.

प्रास्ताविक पंकज कोलारकर (सहसचिव) तर संचालन सुधीर साखरकर (सचिव) व आभार प्रदर्शन विशाल भोळे (सदस्य), आशिष शेळके (सदस्य) यांनी पार पाडले. सदर कार्यक्रमात रेड्डी सव्हीसेसचे के. नरेंद्र रेड्डी व अमर केशरवानी यांनी आधुनिक प्रिंटींग मशीन चे स्टॉल लावून सर्व मुद्रकांना आधुनिक मुद्रणाची माहिती दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रफुल नागपूरे, निलेश भास्करराव, परिमल फडणवीस, प्रशांत ढोले, महेंद्र ठोंबरे, हर्षल एंबरवार, मयुर दुधकोहळे, रोहीत राठोड, सुरज जावंधिया, दिलीप पतंगे, गजानन उपलेंचवार, साबिर शेख, सलिम खान, राजेश मेश्राम, पंकज लालवानी, अमर जोशी, अशोक बोडदे, प्रमोद गेडाम, कुणाल तालपेलवार, प्रशांत ढोरे, निलेश माहुरे, हेमंत रोठे, रघुनाथ शिंदे, आनंद गावंडे, भावेश बिजवे, निलेश चौधरी, राहूल जैन, प्रविण श्रीराव तसेच आर्णी तालुक्यातील मुद्रक राजु नालमवार, नवनित दाभाडकर, गजानन ठाकरे, संजय गड्डमवार, विष्णु राठोड व दारव्हा तालुक्यातील पियुष पारकर, सुनिल ठाकरे, कळंब तालुक्यातील रविंद्र शिरभाते आदि बहुसंख्य मुद्रक बंधू उपस्थित होते.
