ताज्या बातम्यानिवडमानवतविशेषशहर

मानवत तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

(अध्यक्ष पदी प्रसाद जोशी तर; उपाध्यक्ष पदी दशरथ शिंदे पाटील यांची निवड)

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक ०४ जानेवारी) मानवत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जोशी तर उपाध्यक्ष पदी दशरथ शिंदे पाटील व सचिवपदी श्याम झाडगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मानवत येथील शासकीय विश्राम गृहात ०३ जानेवारी शुक्रवारी रोजी पत्रकार संघाची बैठकी आयोजित करण्यात आली होती. बैठकीचा अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष संजय नाईक होते.

यावेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. सचिन चिद्रवार तर तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी सचिन मगर, उपाध्यक्षपदी दशरथ शिंदे पाटील, राम दहे, कोषाध्यक्ष दिगंबर बाकळे, सह सचिव अनिल चव्हाण, सल्लागारपदी जेष्ठ पत्रकार आश्रोबा दादा केदारे, कचरूलालजी वर्मा, गोपाळराव लाड तर सदस्यपदी प्रा. मोहन बारहाते, संजय नाईक, रामेश्वर काष्टे, अमर बारहाते, प्रविण घागरे, पांडुरंग जाधव व त्र्यंबक भिसे यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!