गटविकास अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे शेकापूर येथील दलित समाज मंदिर बनले शोभेची वस्तू
समाधान कांबळे ( माहूर तालुका प्रतिनिधी)
माहूर तालुक्यातील मौजे शेकापुर येथे किनवट माहूर चे विद्यमान आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या प्रयत्नातून वीस लाखाचे दलीत समाज मंदिराला मंजुरी मिळाली कामला सुद्धा सुरू झाली. पण ते काम समाजाला विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने दलित वस्तीत न करता गावाच्या बाहेर व दलित वस्तीच्या बाहेर करण्यात आले.

समाजाने वारंवार कामाला विरोध करून सुद्धा आणि ग्रामपंचायतकडे दलित वस्तीत जागा उपलब्ध असून सुद्धा उपसरपंच यांच्या पतीने जातीपातीचे राजकारण करून सुंदर अशा दलित समाज मंदिरा ला गावाच्या बाहेर करण्यात आल.

यात गटविकास अधिकाऱ्यांना काहीही गावाशी संबंध नसताना गाव पातळीवर येऊन समाजाला न्याय देण्याऐवजी काही पैशासाठी चुकीच्या कामाला सहमती दिली. व समाजावर अन्याय करण्यात आला.आज समाजाने दलित समाज मंदिराकडे पाठ फिरवली गटविकास अधिकाऱ्यांच्या मुजोऱ्या इतक्या वाढल्या आहे की माहूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधल्या अन्याय करणाऱ्यांना हा मुजोर गटविकास अधिकारी साथ देतो.

तर पिडीतांना वाऱ्यावर सोडतो. यांच्याकडून न्याय मिळेल ही अशा माहूर तालुक्यातील जनतेने सोडली आहे.
