ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळशहरसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी भीम आर्मी–आजाद समाज पार्टीकडून नगराध्यक्षांना निवेदन

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सभोवतालचा परिसर मोकळा करून सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत आज भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कां.) यांच्या वतीने नगराध्यक्षा मा. सौ. मोहिनी ताई नाईक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा मोहिनी ताई नाईक यांच्या सोबत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.निवेदनात नमूद करण्यात आले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे संविधान शिल्पकार असून त्यांच्या स्मारकाचा सन्मान राखणे हे प्रशासनाचे सामाजिक व नैतिक कर्तव्य आहे. यापूर्वीही समाजाच्या व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या संदर्भात अनेक वेळा निवेदने व चर्चा करण्यात आल्या असतानाही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

सध्या पुतळ्याच्या सभोवतालचा परिसर अव्यवस्थित अवस्थेत असून त्यामुळे पुतळ्याच्या सौंदर्याला बाधा येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे परिसर मोकळा व सुव्यवस्थित करून नियोजनबद्ध सौंदर्यीकरण व सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत, आजाद समाज पार्टी (कां.) युवा महासचिव विशाल डाके यांच्यासह राहुल धुळे, रवी वागमारे, रोहन जोगदंडे, संदीप सिंग, सूरज खिलारे, केंद्रक खंदारे, रोहन राऊत, शुभम गेले, रविराज कोल्ले, अजय लोखंडे, वैभव सूर्यवंशी तसेच भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!