आरोग्यताज्या बातम्यापरभणीमानवतसामाजिक

मानवत येथे सारथी फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिरात 110 शिव भक्तांनी केले रक्तदान

शिवजन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक २० फेब्रुवारी ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जन्मोत्सवा निमित्य मानवत येथे सारथी फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रक्तादान शिबिरात 110 शिवभक्तांनी रक्तदान केले दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शहरातील एक सामाजिक संस्था- सारथी फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

सदरील कार्यक्रमाचे उदघाटन किर्तीताई कत्रुवार व समाज सेवेत तत्पर असनाऱ्या महिला मंडळी यांच्या हस्ते झाले कार्यक्रम प्रसंगी शहरातील सामाजिक कार्यकर्ते महिला सारथी फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते उपस्थित सर्वांना किर्तीताई कत्रुवार यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले स्वेच्छा रक्तदान शिबिर कार्य क्षमतेने आणि नियमित पणे आयोजित केल्याने आपत्कालीन परिस्थितीत रक्त युनिट्सची पुरेशी उपलब्धता होईल आणि ते सुरक्षित रक्ताचे स्रोत देखील आहेत.

रक्तदान करून, एखाद्या अज्ञात व्यक्तीला जीवनाची दुसरी संधी मिळते तर जिल्हा रक्त केंद्र जिल्हा रुग्णालय परभणी येथील डॉ. श्री. संकेत वाघ (वर्ग१) श्री. विकास कांबळे समाज सेवा अधीक्षक श्री. अनिल सावंत रक्तकेंद्र वैज्ञानिक अधिकारी, मो. इजास, राम डेंगळे, मारुती शिरगजवार यांच्या सह तमाम शिवप्रेमी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!