उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिक

राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार विशेष शिबिर संपन्न

✍️बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दि. १८ फेब्रुवारी) येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार विशेष शिबिर दि.१७ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दत्तक ग्राम मरसूळ, उमरखेड येथे आयोजित केले आहे. शिबीर उद्घाटनाचा कार्यक्रम थाटात पार पडला.

दत्तक गावासाठी आवश्यक असलेले ग्राम स्वच्छता, शोषखड्डे तयार करणे, बंधारा बांधणे हे उपक्रम शिबिरात राबवले जाणार आहेत.

या शिबिरादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात जसे नेत्र चिकित्सा, दंतचिकित्सा, लसीकरण कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य जनजागृती, पर्यावरणाशी संबंधित कार्यक्रम, स्वच्छ भारत, आर्थिक घडामोडी, जलसंवर्धन, कृषी, उद्योजकता, व्यक्तिमत्त्व विकास, महिला सक्षमीकरण, बेटी बचाव, बेटी पढाव, मतदान जनजागृती, युवा विकास ह्या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ .प्रशांत अनासाने रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी यांनी केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थान प्रा. डॉ. डी . व्हि. तायडे प्राणीशास्त्र विभाग, गावंडे महाविद्यालय यांनी भूषविले, कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. संतोष कलाने पत्रकार उमरखेड यांच्या शुभहस्ते झाले.

कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून श्री. मनोज सु कुबडे, श्री. उत्तम को. बनसोड, पोलीस पाटील श्री काशिनाथ पाटील कदम, शाळा समिती सदस्य श्री बंडू पाटील कदम, तंटामुक्ती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते, श्री. सुभाष स. भालेराव, मुख्याध्यापक, श्री दिलीप जाधव पदवीधर शिक्षक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन प्राची चौरे, इतर सदस्य राखी राठोड, अमित केंद्रेकर, सरस्वती निमज्वार, कोमल राठोड, वैष्णवी काळे, कुमकुम बोलजवर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. मिटके मॅडम यांनी केले व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांनी कार्यक्रमात भरभरून सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला .

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!