कोल्हा जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव : शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक साहित्य

(उपक्रमात माजी विदयार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवारांचे ही योगदान)

मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे
मानवत (दिनांक 15 जून) शैक्षणिक सत्र 2025-26 च्या पहिल्याच दिवशी उपस्थित राहणाऱ्या कोल्हा जिल्हा परिषद शाळेतील वर्ग 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकासोबतच लेखन साहित्य ही मिळणार आहे.तरी शाळेतील 100% विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेत उपस्थित राहावे.

जि.प. प्रशाला कोल्हा शाळेचे माजी विद्यार्थी व कोल्हा गावचे लौकिक असणारे डॉ. गोविंद भिसे ( अवर सचिव ,मंत्रालय मुंबई ) व त्यांचे मित्र श्रीकृष्ण कोत्तावार ( संपादक लोकसंवाद मुंबई ) व प्रा. डॉ. रामचंद्र भिसे यांच्या योगदानातून कोल्हा जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणारे लेखन साहित्य ( वह्या , रजिष्टर , पेन इ. ) साठी रु. 25000 एवढी रक्कम शालेय व्यवस्थापनाकडे जमा केली आहे त्या रक्कमेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे पहिल्याच दिवशी वाटप होणार असून 2020 नुसार शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून CBSC पॅटर्न नुसार इ. 1 ली वर्गासोबतच pre- primary ( बालवाटिका सिनिअर वयोगट पालक सहकार्याने ) यांना नवीन अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.

त्याचसोबत वर्षभर विविध स्पर्धा परीक्षांचे तयारी वर्ग घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त करून दिली जाईल.
(श्रेया,मंथन , Math , science) ऑलिंपियाड , जवाहर नवोदय , शिष्यवृत्ती , सातारा सैनिक स्कूल , सरस्वती विद्या ॲकडमी , NMMS , डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा (6 वी व 9 वी) , इलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला इ. परीक्षांच्या तयारी बरोबरच (Mission) मोडवर 5 वी, 8वी व 10 वी वर्गाची वर्षभर शालेय वेळे सोबतच शाळा व्यतिरिक्त वेळ व सुट्टयांच्या कालावधीत ही SMC व पालक यांच्या सहकार्याने सातत्यपूर्ण तयारी केली जाणार आहे.
या सोबतच वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांची जंत्री आनंददायी शनिवार, चला शिकूया विज्ञानातून प्रयोग, we learn English, विविध खेळांची आवडी प्रमाणे तयारी , विज्ञान प्रयोगशाळा , APJ अब्दुल कलाम रोबोटिक लॅब , संगणक कक्ष , प्रत्येक वर्गात ग्रंथालय , शैक्ष. सहल, कोल्हा फेस्टिवल , विविध सांस्कृतिक कार्यक्रम , गणित जत्रा , विज्ञान जत्रा , विज्ञान प्रदर्शन इ विद्यार्थ्यांना वर्षभर अनुभवायला मिळणार आहे.

तेंव्हा आजच आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देणाऱ्या जि.प. शाळेत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असेल यावेळी मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व पालकवृंद कोल्हा व शाळा प्रशासनाने दिली.
