पर्जना येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन 69 वा येथे उत्साहात संपन्न
दिनांक 2/10/2025 प्रजना धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .नवीन कर्मचारी झाले त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गावातील उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

गावातील ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच सचिव आणि पोलीस पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रविकिरण नारायण दवणे सर परजना यांनी केले,, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ.अनिल काळबांडे सर.मिलिंद महाविद्यालय मुळावा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांनी त्यांच्या सुंदर वाणीतून सर्व उपासक-उपासिकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व … तसेच शिक्षणाचे महत्त्व व परिस्थितीवरील मात याविषयी सखोल मार्गदर्शन गावातील सर्व महिलांना आणि पुरुष यांना केले आहे.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक राजाभाऊ धांडे सर यांची सुद्धा उपस्थिती होती.यांनी सुद्धा बाबासाहेबांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती देऊन आपल्या जीवनात कमीत कमी आणि जास्तीत जास्त पंचशील आणि अष्टशील यांचे महत्त्व ठासून सांगितले आहे. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे.नवयुवक तरुण मंडळ पर्जना यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील महिला पुरुष आणि नवयुक्त तरुण मंडळ इन मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषदेचे शिक्षक सनद नलेवाड सर यांनी आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाचे सांगता झाली. कार्यक्रमाच्या सांगता नंतर सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.

