उमरखेडमहाराष्ट्रराजकिय

उमरखेड विधानसभा क्षेत्रातील मतदान बंधू-भगिनी बजावला मतदानाचा हक्क

✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518

✒️ सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर उपसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 20 नोव्हेंबर) महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू उमरखेड विधानसभेमध्ये अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करून एकूण 17 उमेदवार रिंगणात लढत आहेत.आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याची सुरुवात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आला आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी आणि भारतीय संविधान वाचविण्याकरिता मतदानाचा हक्क बजावला आला आहे.उमरखेड मतदार संघातील यावेळी हजारो नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.उमरखेड मतदार संघामध्ये अंदाजीत 67.90 टक्के आहे.

अशी माहिती सखाराम मुळे (निवडणूक निर्णय अधिकारी 82 उमरखेड (अ.जा) मतदार संघ) यांनी एका पत्रानुसार दिली आहे.उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये खरी लढत काँग्रेसचे साहेबराव कांबळे, भाजपाचे किसनराव वानखेडे आणि राजेंद्र नजरधने (मनसे) यांच्यामध्ये खरी लढत दिसून येत आहे.

कोणत्याही एका उमेदवाराला पक्षाला निश्चित मताधिक्य मिळण्याची शक्यता कमी असून कोण बाजी मारेल हे आता जनतेच्या मतदानावर ठरणार आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!