उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

राजे संभाजी नगर उमरखेड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य प्रबोधन कार्यक्रम संपन्न

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 20 एप्रिल) “महापुरुषांच्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारांवर अंमल केल्याने महापुरुषांचे राहिलेले अधूरे करू पूर्ण होईल. वर्तमान मनुवादी षडयंत्र ही अठरापगड जाती धर्मातील बहुजनांनी एकत्र येऊनच थांबविल्या जाऊ शकतात.धर्माच्या नावावर ओबीसी एससी,एसटी चा वापर केल्या जात आहे. परंतु त्यांचे संविधानिक अधिकार मात्र नष्ट केल्या जात आहेत.”असे प्रतिपादन संविधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानाचे संयोजन प्रबोधनकार प्रा.बाळासाहेब गावंडे यांनी केले.

प्रियदर्शि सम्राट अशोक तथा जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपति शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,सम्राट अशोक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात राजे संभाजी नगर बोरबन उमरखेड येथे ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटक नायब तहसिलदार सुभाषजी पाईकराव हे होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून चक्रधर पाटील देवसरकर यांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी मराठा ओबीसी बांधवांसाठी केलेल्या योगदानामुळे प्रकाश टाकला.तर डॉ.अजय लोकरे यांनी महाबोधी महाविहार प्राचीन विरासात आणि मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.

प्रमुख उपस्थीती म्हणून दिपक कांबळे (से.नि.ए.एस.आय. उमरखेड),प्रकाश हापसे (सु.धम्म प्र. मंडळ अध्यक्ष),अनीताताई पाटील (सामाजिक कार्यकर्त्या उमरखेड),यशवंत काळबाडे (अध्यक्ष बुध्दिस्ट रि.ए. असो.),प्रकाश कांबळे (सामजिक कार्यकर्ते),अविनाश शिंदे (छत्रपती क्रांती सेना),अशोक भालेराव (माजी कृषि अधिकारी), साहेबराव धात्रक (ओबीसी पि.सं. विभागीय अध्यक्ष), मा. शेख जब्बार भाई. (सामाजिक कार्यकर्ते ढानकी), सिद्धार्थ दिवेकर (सहसंपादक महाराष्ट्र वायरल न्युज चॅनल) इत्यादीची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रियदर्शि सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष इंजि.विद्वान केवटे यांनी केली, संचलन राहुल कांबळे तर आभार सचिव प्रशिक नंदुरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रियदर्शि सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट तथा जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळ तथा भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अठरापगड जाती धर्मातील बहुजनांनी एकत्र येऊन केलेला हा प्रबोधन कार्यक्रम सामाजिक,धार्मिक, जातीय सलोखा वाढविणारा ठरलेला असून सदर कार्यक्रमाचे व आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!