उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

उमरखेड येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

[रमाईचा त्याग हा विकसित देशासाठी – सुधाकरराव लोमटे]

(संविधानाच्या मागची नाईका म्हणजे माता रमाई – सरोजताई देशमुख)

(रमाई वाचल्याने बाबासाहेब कळतो पण बाबासाहेब वाचल्याने रमाई काळात नाही – प्रमोदिनी किनाके)

रमाईच्या गीतावर थिरकल्या महिला…!

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड (दिनांक ९ फेब्रुवारी) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील सम्यक बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहासकार,वक्ते सुधाकरराव लोमटे सर (कवी, लेखक) हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रणरागिणी सरोज ताई देशमुख (समाजसेविका), प्रमोदिनी किनाके (एसटी आगार प्रमुख), इतिहासकार डॉ. सुनील कवडे सर, हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका), भंते कीर्ती बोधी, श्री.भगत मॅडम, पत्रकार सुनील लोखंडे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करत तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रम सुरू करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे रमा माता महिला मंडळाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनिल कवडे सर, प्रमोदिनी किनाके, यांनी रमाई आपले प्रखर मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. तसेच सरोजताई देशमुख यांनी सुद्धा त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून आपले अमूल्य विचार उपस्थित नागरिकांना सांगितलेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरराव लोमटे सर यांनी रमाई आणि प्राचीन भारत याबद्दल संशोधनात्मक इतिहास सांगून अध्यक्षीय समारोप करून मार्गदर्शन केले. लोमटे सर पुढे ते म्हणाले की, निसर्गाने सृजनशीलता ही स्त्रियांना बहाल केली आहे.

या सृजनशीलतेतूनच माता रमाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी संसारीक कार्यातून मुक्त केले व राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी राष्ट्राला बहाल केले. त्यांच्या या असीम त्यागामुळेच भारत हे एक शक्तिशाली, बलशाली राष्ट्र निर्माण होत असल्याचे आपण बघत आहोत.

सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक,राजकीय या आणि अशा सर्व क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत. या प्रगतीचे दिशादर्शक व उर्जादायी मूळ हे भारतीय संविधान असून संविधानाचे निर्माते हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर असले तरी देखील ही संविधानरुपी सृजनशीलता रमाईच्या त्यागातून आलेली आहे.हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.

रमाईच्या जीवन कार्याचा आढावा घेत ते पुढे म्हणाले, आज आपण माता रमाई महिला मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी ज्या नवतरुणाची निवड केली, तो तरुण सामाजिक कार्यकर्ता निर्भिड पत्रकार अशी ओळख असलेला सिद्धार्थ दिवेकर होय. एका योग्य तरुणाला उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कृत केल्याबद्दल त्यांनी रमा माता महिला मंडळाचे मी आभार मानले.

रमाई जयंतीच्या या मंगलमय सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर लोमटे यांचे दुसरे पुस्तक बुद्ध मार्गाचा प्रवाशी – युवान च्वांग व पुनर्मुद्रित करण्यात आलेले पहिले पुस्तक सुवर्ण युगाचा निर्माता – सम्राट अशोक या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यां सरोजताई देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी भिक्खू संघाचे प्रतिनिधी वंदनीय भदंत किर्ती बोधी उपस्थित होते.

चौकट :- रमाई माता ही त्यागाची मूर्ती आहे. पती पत्नी मधील सामंजस्य शिकावं ते रमाई पासून प्रखर आशा सूर्य प्रमाणे तळपत राहणाऱ्या पतीची पत्नी म्हणुन जगतांना किती सहानुभूती ने आणि वात्सल्याने भरभरून असलेली माता रमाई आम्हा सर्वां पुढे एक आदर्श आहे. आम्ही आज रमाई चे लेकरं आहो याचा अभिमान पूर्ण आयुष्यात जीवन सुंदर आणि सुखी बनवितो हे आमचे भाग्य आहे. – डॉ. सुनिल कवडे

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनिल कवडे सर, प्रमोदिनी किनाके, यांनी रमाई आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सरोजताई देशमुख यांनी सुद्धा त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून आपले अमूल्य विचार उपस्थित नागरिकांना सांगितलेत.

या कार्यक्रमाचे आयोजन रमा माता महिला मंडळ यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते. उषाताई इंगोले अध्यक्ष, भारतीताई केंद्रेकर उपाध्यक्ष, उज्वला धबाले,बेबाबाई गवंदे, कांचन दिवेकर, स्वाती दिवेकर मधुबाला दिवेकर, विद्या इंगोले, सुनिता दिवेकर, राखी धबाले, प्रज्ञा दिवेकर, शिल्पा धबाले,भारताबाई दिवेकर, ज्योती हटकर, रंजना आठवले, वर्षा गायकवाड, इत्यादींनी अथांग परिश्रम घेतलेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना) यांनी केली.तर आभार प्रदर्शन प्रफुल दिवेकर (शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी) यांनी मानले.

यावेळी अनेक बौद्ध उपासक, उपासिका, तरुण मंडळी, बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!