ताज्या बातम्यादेश-विदेशपरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

नरळद येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजसत्ताक दिन उत्सहात साजरा

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत (दिनांक २७ जानेवारी) तालुक्यातील मौ. नरळद येथील जिल्हा परिषद शाळेत २६ जानेवारी रोजी ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व भारतीय संविधानास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन सैन्य दलातील जवान अनिकेत फंड यांच्या हस्ते करण्यात आले.

गावातील युवा नेते रंजित (भैया ) तुपसमुंद्रे यांनी नरळद जिल्हा परिषद शाळेस भारताचे संविधान पुस्तक भेट दिले.

यावेळी त्यांचे शाळेचा वतीने आभार व्यक्त करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्यंकट माने, श्री. बि. एम. पाते, श्री. पि. एस. कदम, श्री. एस. जे. शिंदे, श्री. ए. जी. राऊत यांच्या सह यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक व जेष्ठ नागरिक आणि महिलांसह विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!