स्वतःच्या मालकीच्या जागेचा नमुना ८ मिळण्यासाठी उपोषणाला बसला तरुण

(उपोषणाला पाच दिवस उलटले तरी प्रशासनाला जाग आली नाही)
✍🏻 समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)

माहूर तालुक्यातील सेलू या गावचे रहिवाशी अतुल गावंडे यांना स्वतःच्या मालकीच्या जागे संदर्भात नमुना नं.८ मिळवण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली.
आज उपोषणाचा सलग पाचवा दिवस आहे,अजूनही प्रशासन झोपेतच का…? दोन्ही ग्रामसेवकांना प्रशासन पाठीशी घालत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

उपोषणकर्त्याच्या जवळूनच गटविकास अधिकारी त्यांच्या कार्यालयात जातात परंतु उपोषणकर्त्यांना प्रत्यक्ष भेट अद्यापही दिलेली नाही.स्वतःच्या जागेचा नमुना नं. ८ मिळावा म्हणून उपोषणाला बसावे लागते,प्रशासनाला जाग येईल तरी कधी..? आठवड्यातून किमान एकदा तरी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला स्वतःच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावे लागत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे.चौकशी करू म्हणणाऱ्यांनी सलग पाच दिवस झाले अद्यापही काही चौकशी केली नाही,हे खूप मोठे दुर्दैव आहे.

घोटाळेबाज ग्रामसेवक फोन बंद करून अजूनही गायब,तर सेलू येथील ग्रामस्थांना न्याय देण्यात आला,असे गटविकास अधिकारी यांचे एका व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज.
