मानवत शहरात वर्षा अखेर औषधी भवन उभारणार – डॉ. अंकुश लाड

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238
परभणी (दिनांक २५ जानेवारी)मानवत शहरात असलेल्या केमिस्ट बांधवांसाठी समाज उपयोगी औषधी भवन या वर्षाच्या अखेरीस उभारून लोकार्पण करून देऊ असे आश्वासन युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी औषधी विक्रेते व्यवसायांना दिले आहे.
मानवत तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. मानवत तालुका केमिस्ट संघटनेच्या वतीने माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या रोप्य महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या होते हा २४ जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक मानवत येथे पार पाडला.

मानवत तालुका केमिस्ट संघटने कडून आज पर्यंतचा मानवत शहराचा नव्हे तर जिल्ह्याचा विक्रम मोडत सर्वोच्च ४०१ रक्तदात्यांचे रक्त संकलन करून सर्वात मोठे रक्तदान शिबिर घेतले. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपदी युवा नेते डॉ. अंकुश लाड तर उद्घाटक म्हणून मानवत तहसीलचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड प्रमुख उपस्थितीत मानवत नगरीच्या प्रथम नागरिक मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे, मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शेख आशिक, डॉक्टर असोशियनचे कार्याध्यक्ष डॉ. सचिन कदम, मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी, व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष कचरुलाल बारहाते, पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष गोपाळराव लाड हे होते.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सर्व केमिस्टांच्या वतीने प्रास्ताविका मध्ये केमिस्ट संघटनेला कोणताही समाज उपयोगी कार्यक्रम घ्यायचा असेल तर रस्त्यावर नाही तर भाड्याच्या जागेत घ्यावा लागतो. त्यामुळे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी मानवत शहरात औषधी भवन उभारावे अशी मागणी केली होती.
त्याच अनुषंगाने अध्यक्षिय समारोप करताना डॉ. अंकुश लाड यांनी सांगितले की मानवत शहरात केवळ औषधी भवनच नव्हे तर व्यापारी महा संघासाठी,पत्रकार बांधवांसाठी व डॉक्टर असोसिएशन साठी अशा चार संघटनांचे एकत्रित मिळून साधारणतः तीन कोटी रुपयांचे भव्य असे सभागृह उभारून प्रत्येकांच्या कामकाजासाठी व समाज उपयोगी कार्यक्रमांसाठी ते उपयोगी पडेल. हे सर्व २०२५ च्या वर्षा अखेर आपण लोकार्पण करू असे ही त्यांनी उपस्थित त्यांना आश्वासन दिले.

केमिस्ट संघटने कडून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरा वेळी जिल्हा शासकीय रक्तपेढीचे साधारणतः २० कर्मचारी व मानवत ग्रामीण रुग्णालयाचे १० कर्मचारी त्यात पथक प्रमुख म्हणून डॉ. गज दत्ता चव्हाण, डॉ. ललित कोकरे यांच्या सह शिवप्रभा सोगे, प्रज्ञा जगझाप, शेख हिना, शोभा राजपूत, नरेंद्र टोम्पे, सुनील खरात, कपिल भरड, बजरंग ढवळे अधिक कर्मचारी यांनी या रक्तदान शिबिराच्या वेळी सकाळी ८ ते ६ वाजेपर्यंत आपले कर्तव्य पार पाडले.
केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक, सचिव लक्ष्मण जवादे, जिल्हा कार्यकारणी सदस्य दिगंबर बाकळे यांच्या सह प्रशांत लकडे, अनिल ढमढेरे, गोविंद ढमढेरे, शाम लाटकर, गजेंद्र मसलकर,

दिपक दुगाने, सूर्यकांत माळवदे, ज्ञानेश्वर होगे, ज्ञानेश्वर हेंडगे, डॉ. राजेश दहे, सार्थक साखरे, शशिराज फटाले, संदीप देशमाने, कुलदीप दगडू विशाल भालेराव ,कपिल सत्वधर, संजय बाहेती, अनंत यादव, प्रवीण इक्कर , संतोष रुद्रकंठवार, आदी केमिस्ट संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले.
