आरोग्यक्रीडाताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रसामाजिक

परभणी जिल्हा परिषदेतील योग शिबिराचा उत्साहात समारोप

[स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आयुष विभागाचा उपक्रम]

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी ( दिनांक २५ जानेवारी ) परभणी येथील जिल्हा परिषद प्रांगणात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आयुष विभाग, निरामय योग केंद्र आणि आरोग्य वर्धिनी योग शिक्षक संघ (महाराष्ट्र योग शिक्षक संघ संलग्न) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिक्षक शिबिराचा समारोप २५ जानेवारी शनिवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आयुष अधिकारी श्री. डॉ. ज्ञानेश्वर वडमिल वार, केंद्राचे प्रमुख राहुल झांबड आणि आरोग्य वर्धिनी योग शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष गजानन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्य क्रमाच्या प्रारंभी मुख्य योग शिक्षिका विद्याताई खंदारे यांनी नियमित योग वर्गात योगिक क्रिया बाबत मार्गदर्शन केले. सहयोग शिक्षक म्हणून अंकुश गरड व आरतीताई शिंदे यांनी प्रात्य क्षिक करून दाखवले. कार्य क्रमाचे प्रास्ताविक वसंत पारवे यांनी केले.

प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे योग शिक्षक वसंत पारवे, डॉ.अश्विन वायाळ, सचिन रायपत्रीवार, चंद्रकांत देशमुख, अशोक तळेकर, सुंदरदास मोरे, अविनाश राऊत, कैलास बेले, अरुण पाठक, मयंक सोनटक्के, अमोल राऊत, उद्धव सूर्यवंशी, सुबोध मते,

निलेश मते, सतीश भरोसे, लक्ष्मण निरस, आरती ताई शिंदे, टिकाराम कदम, वर्षा शिंदे, सुरेखा मते यांचा सन्मान करण्यात आला योग साधक अधिकारी नितीन यादव, सोनटक्के व इतरांनी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक तळेकर यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत देशमुख यांनी केले.

शांती पाठ योग शिक्षिका सुरेखा मते यांनी घेतला. या कार्यक्रमास आरोग्यवर्धिनी योग शिक्षक व योग शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!