उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरशैक्षणिक

उमरखेड येथील शहीद भगतसिंग न.प मराठी शाळा क्र. 2 येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

(वर्ग एक ते पाच च्या विद्यार्थी, विद्यार्थिनी शालेय पुस्तके गणवेश शूज मान्यवरांच्या हस्ते वाटप)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड:- (दिनांक 24 जून) स्थानिक नगर परिषद उमरखेड अंतर्गत असलेली शहीद भगतसिंग नप मराठी शाळा क्र 02 उमरखेड येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रसंगी उमरखेड नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल नरवाडे, उपाध्यक्ष शैलेश ताजवे व व्यवस्थापन समिती चे सदस्य सिद्धार्थ दिवेकर, पत्रकार स्वरांजली वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे अनिल नरवाडे पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये नविन प्रवेशीत 103 विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तक,बूट तथा गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुनील कवडे सर तर आभार अंकुश राजे सर यांनी मानले.

प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आशिष राठोड सर, विजय सूर्यवंशी,अंकुश राजे, कु. अंजली राजपूत, प्रा. डॉ.सुनील कवडे सर, विकास गिरी ,लक्ष्मीकांत मुटकुळे, सौ.रंजना बारे मॅडम, सौं पोंगाने मॅडम, श्रीमती वानखेडे मॅडम, सौं. सोनाळे मॅडम, सौं येलकर मॅडम, सौं सोनोने मॅडम, सौं.बसवंते मॅडम , सोनेवार मॅडम, बोके मॅडम, बारे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले व प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!