अपघातउमरखेडशहर

उमरखेड तालुक्यातील बाळदी रोड वर टिपरच्या धडकेत युवक जागीच ठार

✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड – (दि ३० डिसेंबर) कॉलेज करून घराकडे जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टिपरने धडक दिल्याने १९ वर्षीय युवक जागेवटच ठार झाल्याची घटना सोमवार ३० रोजी दुपारी १.४५ वाजता दरम्यान बाळदी रोड वरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ घडली.

अपघातात मृत्यू झालेल्या मूर्तकाचे नाव अजित गजानन राठोड रा. कृष्णापुर तांडा ता. उमरखेड असे असून आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच २९ सीजी ३५१९ हा असून दुपारी कॉलेजवरून घराकडे जात असताना मागून येणाऱ्या MH एम एच ४८ टी ५५८० या टिप्परने जोरदार धडक दिल्याने बाळदी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा जवळ अजित यांचे जागीच मृत्यू झाला.

अजित राठोड हा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये शिकत होता. सदर अपघाताचे फिर्याद मृतकाचे वडील गजानन गोकुळ राठोड व ४० वर्ष यांनी पोलीस स्टेशन फिर्याद दिली असून वाहन चालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

सदर अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!