ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिकसामाजिक

आनंद नगरीचा माध्यमातून नव उद्योजक घडतील – आसिफ अली खान

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक २१ जानेवारी) दिनांक २१ जानेवारी मंगळवार रोजी आनंदनगरी या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दरवर्षी विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे यातून नव उद्योजक घडतील असे मत आसिफ अली खान यांनी व्यक्त केले.

मानवत शहरातील इकरा सेमी उर्दू शाळा मध्ये वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त कबड्डी, खो – खो स्पर्धा, धावणे, क्रिकेट, व्हॉलीबॉल, स्लोसायकल, लिंबू चमचा अशा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तर विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका याचा अनुभव मिळावा या उद्देशाने आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाट्न डॉ. मनिषाताई गुजराती यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थित म्हणून आसिफ अली खान, व्हाइस ऑफ मीडिया मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. कचरुला लजी बारहाते, समाज सेवक शगिर खान, पत्रकार इरफान बागवान हे होते पुढे बोलताना आसिफ अली खान म्हणाले की, विद्यार्थी दशेत मिळालेली व्यवसायाचे शिक्षण भविष्यातले उद्योजक निर्माण करतील आणि उद्योजक आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून शासनास कर (टॅक्स) भरतील आणि टॅक्सच्या माध्यमातून या देशाचा विकास होईल त्यामुळे उद्योजक आणि ग्राहक हे शिक्षण शालेय पातळीवर मिळणे अत्यन्त गरजेचे आहे ते मिळवून देण्याचे काम संबंधित शाळा करत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेरुद्दीन काझी यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ इडली, वडापाव, समोसा, चने, भेळ, चिवडा, पापड, ब्रेडपकोडा, मुगवडा,गाजर हलवा अशा विविध पदार्थांचे तर बोर, टहाळ, बोरकूट अशी शेती संबंधित पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.

या उपक्रमात शाळेतील तब्बल १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला.

मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरुनच साहित्य बनवून आणुन शालेय आवारात ५७ स्टॉल लावले होते या आनंद नगरी मध्ये जवळपास पन्नास हजार रुपयेची उलाढाल झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सिराज अली खान, मोहम्मद मुजाहिद ,सय्यद जुनेद, इमरान खान शेख तन्वीर, इमरान कुरेशी, मौलाना मुजाहिद, श्रीमती खुदसिया, श्रीमती, साजिया, रिजावान कुरेशी, महोम्मद फुरकान, नोमान बागवान यांनी परिश्रम घेतले विशेष म्हणजे आनंद नगरी मध्ये स्वच्छता बाबत लक्ष देण्यात आले या कार्यक्रमाचे आभार डॉ. एम. ए. रिजवान यांनी मानले.

चौकट :- शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे शालेय जीवनात शिक्षणा सोबत विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान देखील येणे गरजेचे आहे.

कारण जे शिक्षणातून हूकत असतात त्यांना व्यवसायचे ज्ञान येणे गरजेचे आहे. आयोजित आनंद नगरी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टाँल लावून स्वतःहा बनविलेल्या पदार्थाची विक्री करुन त्यातुन दोन पैसे मिळवले हे खरच कौतुकास्पद आहे.

संस्थेने राबविलेला हा उपक्रम त्यांना भविष्यात नेहमीच चालना देईल असे मत यावेळी व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे मानवत तालुका अध्यक्ष श्री. कचरूलाल बारहाते यांनी व्यक्त केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!