ताज्या बातम्यामहाराष्ट्रमानवतशहरसामाजिक

मानवत येथील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचा रंग रंगोटीचे व सुशोभीकरणाचे काम तात्काळ करा

[नागरिकांची मानवत नगर परिषदेकडे मागणी]

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक २० जानेवारी) मानवत येथील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचा रंगरंगोटीचे व सुशोभीकरणाचे काम मानवत नगर परिषदेने तात्काळ करावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने २० जानेवारी रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भारतीय स्वतंत्र्य लढ्यातील महापुरुष नेताजी सुभाष चंद्र बोस यांची येत्या २३ जानेवारी रोजी १२८ वी जयंती सर्वत्र साजरी करण्यात येणार असून मानवत येथील क्रांती चौक या ठिकाणी असलेल्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याची अत्यन्त दुरवस्था झालेली असून जयंती पूर्वी पुतळ्याची दुरुस्ती करून चांगल्या दर्जाची रंग रंगोटी व सुशोभीकरण करण्यात यावे.

अशी मागणी यावेळी करण्यात आली असून दिलेल्या निवेदनावर अ‍ॅड. दिनेशकुमार दहे, अ‍ॅड. विक्रम सींह दहे, मा. नगरसेवक शामभाऊ चव्हाण, विष्णुपंत उदावंत, अ‍ॅड. मोहन बारहाते, रामराव बारहाते, सुहाम नाईक, संतोष चालेवार, सदाशिव दहे, सुनिल चिद्रवार, प्रकाश जोशी, बालाजी उपाध्याय,

संदीप कच्छवे, महावीर उखळकर, अरुण कच्छवे, सुशिल रामभाऊ, मा. नगसेवक शेषराव दहे, रमेश पाटील, शे. ईफ्तेजार अ. कादर, पवन वर्मा, रामभाऊ सोनूळकर, धनंजय गोलाईत, मोसीन अन्सारी, गणेश गोलाईत, ओम दहे, बळीराम दहे यांच्या सह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!