कृषी धनताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

प्रसासनाचा मध्यस्थी नंतर मानवत येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन स्थगित

[प्रसासनातील अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन]

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक २१ जानेवारी)स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वतीने २० जानेवारी रोजी पाळोदी रोडवरील नागरजवळा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

पाळोदी रस्ता कामाचे अत्यन्त निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यामुळे हा रास्ता रोको पुकारण्यात आला होता मात्र मानवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. संदीप बोरकर आणि तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मध्यस्थी व सविस्तर चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले व या संदर्भात तात्काळ मानवत तहसील कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रसासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली.

मानवत ते पाळोदी रस्त्याचे काम अत्यंत संत गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असून रस्ता साईड ने कुठे सहा इंच तर कुठे फुट भर खोद काम करून गिट्टी टाकत आहेत त्यावर मुरूम नाही, पाणी नाही तसेच कुठली ही रोलिंग सुद्धा केली जात नाही त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे गिट्टी पसरत आहे त्यामुळे मोटरसायकल स्लीप होऊन अनेक अपघात होत आहेत यावर अनेक तक्रारी झाल्या तरी ही संबंधित ठेकेदार यांना तीळ मात्र फरक पडला नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले त्यानंतर तात्काळ प्रशासनाला जाग आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व्ही. लव्हेकर यांनी तोंडी सांगितले की ठेकेदाराकडून व्यवस्थित काम करून घेतो व संघटनेने दिलेल्या सुचना त्यांना सांगून त्या पद्धतीने काम करण्यात येईल असे सांगितले दरम्यान बैठक संपल्यानंतर अभियंता व्ही. लव्हेकर व संघटनेचे पदाधिकारी यांनी रस्त्याची पाहणी केली आणि एक साईटचा रोड हा एका महिन्यात पुर्णपणे वाहतुकीस उपलब्ध करण्यात येईल आश्वाशित केले कालावधीत एक साईटचा रोड वापरण्या योग्य उपलब्ध न झाल्यास काम बंद करण्यात येईल.असा इशारा ही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ ढगे, गजानन तुरे, मानवत तालुका ध्यक्ष नामदेव काळे, गोपाळ आबा काळे, सावळी ग्रामपंचायतचे सरपंच माणिकराव काळे, हत्तलवाडी ग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा भैया शिंदे, मानोली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मणराव शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव चोखट, युवा तालुकाध्यक्ष दत्ताराव परांडे, महादेव काळे, विठ्ठल काळे, रंजित चव्हाण, किशनराव शिंदे, अशोक कदम, अशोक काळे, उद्धवराव काळे, बाबा शिंदे, माणिक चौकट,‌ बळीराम पतंगे यांच्या सह संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!