ताज्या बातम्यापरभणीमानवत

मानवत पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची स्वच्छता व रंगरंगोटीची झलकळी

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- ( दिनांक १८ फेब्रुवारी) महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसाचा कृती आराखडा या उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस प्रशासनाचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनातून मानवत पोलीस ठाण्यात स्वच्छता अभियान तसेच श्रमदान अभियान राबवण्यात आले.

यातून जुन्या असलेल्या इमारतीला स्वच्छता व रंगरंगोटीतून झलक मिळाली असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसाचा कृती आराखडा या उपक्रमा अंतर्गत करावयाच्या ०७ कलमी कार्यक्रम हा इतर प्रशासकीय विभागा प्रमाणेच परभणी जिल्हा पोलीस दलाने देखील हाती घेतला असून कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला आहे.

परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम आयोजित केला आहे. शासकीय कार्यालय व परिसर या ठिकाणची स्वच्छता याला महत्त्व दिले जात आहे.

परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व त्यांचे अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या ठाण्याच्या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता मोहीम व श्रमदान राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत या उपक्रमा अंतर्गत मानवत पोलीस स्टेशन मध्ये नगरपालिका प्रशासनाचा सहकार्याने पोलीस स्टेशनचे रुपडे पालटले आहे.

मानवत पोलीस स्टेशनच्या कार्यालयात स्वच्छता मोहीम व श्रमदान करून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. तत्पूर्वी पोलीस स्टेशनच्या परिसरा मध्ये संपूर्ण पृष्ठभागावर सिमेंट काँक्रीटचे बेड टाकून पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिकठिकाणी पावसाळ्यात साचणाऱ्या डबक्या पासून सुटका करवुन घेतली.

तसेच पोलीस ठाण्याच्या नवीन इमारत व इंग्रज कालीन असलेल्या इमारतीला रंग रंगोटी करून त्याचे रूप पलट विण्यात आले.

या मोहिमेत मानवत पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. संदीप बोरकर यांच्या सह त्यांचे सहकारी पोलीस उप निरीक्षक श्री. दिगंबर पाटील, नागनाथ पाटील, श्री. अनिल खिल्लारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री. किशनराव पतंगे,

पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे, पोलीस कर्मचारी श्री. शेख मुन्नू, श्री. नारायण सोळंके, श्री. शेख जावेद, श्री. डी. जी गायकवाड, श्री. गोविंद वड, श्री. अतुल पंचांगे, श्री. शेख मुखींद, श्री. खंडेराया राऊत, श्री. विजय टाक, श्रीमती. शकुंतला चांदीवाले, श्रीमती. मनिषा वाकळे या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान व श्रमदान अभियाना मध्ये मोठया संख्येने सहभाग नोंदवला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!