ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसन्मान सत्कारसामाजिक

हरदडा येथील अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद हजारो नागरिकांच्या उपस्थित संपन्न.

(सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई गौतम कांबळे यांनी केले होते बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन)

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड :- तालुक्यातील हरदडा येथे आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद हजारो नागरिकांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न.

सकाळच्या सत्रात सुजाताबाई दवणे यांच्या हस्ते तर प्रमुख मान्यवरांचा उपस्थीतीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठविधीतज्ञ डी. एफ. हरदडकर हे होते. तर सुरुवातीला भंते पय्याबोधी व उपस्थीत भिक्षू संघाच्या यांच्या हस्ते उपस्थितांना सामूहिक त्रिशरण पंचशील प्रदान करण्यात आले.

त्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या धम्म परिषदेचे उद्घाटन करून आपल्या मनोगतातून , विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्मच असल्याचे प्रतिपादन केले.

यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब शेळके , प्रशांत वाठोरे, अरुण आळणेअनिल साळवे , सरोज देशमुख, वीरेंद्र खंदारे , गौतम कदम ,दत्तराव काळे ,उत्तम सिंगणकर सुधाकर कांबळे (खरुसकर ), सरपंच सुनिल कवडे , सरपंच दैवशिला विलास पायघण ‘ अशोक कदम, जयकिन रावळे , विजू कदम, कैलास कदम यासह मान्यवर धम्मपिठावर उपस्थित होते.

यावेळी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तथा महिला पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला. मोहन कांबळे, अशोक चिंचाळे मधुकर कांबळे,यशवंत जोंधळे दिलीप वाहुळे तर हैदराबाद येथून आलेले धम्म कार्य करणारे अशोक चितोरे,मोहन कांबळे, यशवंत जोंधळे, दिलीप कसबे , मधुकर कांबळे, किसन थुल, यांच्यासह समाजात कार्य करणाऱ्या पत्रकार सिद्धार्थ दिवेकर पत्रकार गौतम वाठोरे इत्यादी अनेक मान्यवरांचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बौद्ध धम्म हे अथांग ज्ञानाचे महासागर आहे. या सागरामध्ये जो येईल त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व समाजाला जोडणारा संपूर्ण विश्वात शांतता तथा बंधुता साधणार आजच्या घडीला जर एकमेव कुठला विचार असेल तो तो बुद्धाच्या शांतीचा करुणेचा अहिंसेचा मानवतेचा मार्ग आहे. त्यामुळे धम्मपरिषद या समाजाचे ऊर्जा केंद्र बनले पाहिजे असे प्रतिपादन प्रो. डॉ .अनिल काळबांडे यांनी केले.

या धम्म परिषदेचे प्रमुख वक्ते दादासाहेब शेळके यांनी ‘सुद्धा आपल्या प्रखंड आणि विद्रोही वाणीतून ‘ समाजाला पोट जातीतून मुक्त झाल्याशिवाय समाजाचा विकसित होणार नाही धम्मपरिषदा या यशस्वी होणार नाहीत, कुणाचेही गुलाम आणि बटीत बनण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आपला विकास करण्याचे त्यांनी आवाहन केले.

तसेच यावेळी तेलंगणा राज्यातून आलेले अनिल साळवे, रामराव गायकवाड यांनी समाजाला एकसंघ झाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही.

तर अरुणदादा आळणे यांनी धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्माचे विचार पेरल्या जावे व सर्व समाज एकसंघ व्हावा त्याचबरोबर किनवट येथे होणाऱ्या दोन दोन धम्म परिषदा ह्या निश्चित समाजाला दिशा देणाऱ्या नाहीत तेव्हा त्या एकसंघ व्हाव्या अशी त्यांनी आवाहन केले.

जिजाऊ बिग्रेडच्या सरोज देशमुख यांनी, तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये व बाबासाहेबांच्या संविधानामध्ये जो महिलांना हक्क आणि अधिकार मिळाला त्यामुळेच सर्व क्षेत्रांमध्ये आज महिलांनी प्रगती केल्याचे त्यांनी सुचित केले.

या भव्य दिव्य धम्म परिषदेचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिता कांबळे,गौतम कांबळे व त्यांचे सर्व सहकारी तर यांनी अथांग परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर कवडे व प्रदिप कांबळे यांनी केले . रात्रीला आकाश राजा व दीदी अंजली भारती यांच्या बुद्ध भीम गीताचा वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम हजारोच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!