ताज्या बातम्यामहाराष्ट्रमानवतसामाजिक

रामेटाकळी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांची जयंती साजरी

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत ( दिनांक १३ जानेवारी )मानवत तालुक्यातील मौ. रामेटाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता, राजमाता माँ साहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना घडविणाऱ्या आदर्श राजमाता, माँ साहेब जिजाऊ यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.

यावेळी रामेटाकळी ग्राम पंचायतचा सरपंच मंदाकिनी गंगाधर कदम, उपसरपंच मोहन कदम, ग्रामसेवक तुकाराम पतंगे, ग्राम पंचायतचे कर्मचारी अक्षय कदम , पाणी पुरवठा कर्मचारी विठ्ठलराव कदम, नारायण कदम, दिगाबर कदम, अर्जुन दुधाने यांच्या सह ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!