आरोग्यउमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरसामाजिक

उमरखेड येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त भव्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन

(२०७ वा भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि १४ जानेवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शिबिराचे आयोजन)

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड (दिनांक १२ जानेवारी) शहरामध्ये दिनांक 14 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन आणि २०७ वा भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्ताने भव्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन सुमेध बोधी बुद्ध विहार, सिद्धेश्वर नगर, बोरबन उमरखेड येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजक रवींद्रभाऊ वाठोरे मित्र मंडळ सुमेध बोधी युवा मंडळ नवज्योत दुर्गोत्सव मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड, उमरखेड यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार किसनराव वानखेडे (उमरखेड महागाव विधानसभा) हे असणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नितिनभाऊ भुतडा (जिल्हासमन्वयक यवतमाळ पुसद भा.ज.पा) हे राहणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शंकर पांचाळ (ठाणेदार उमरखेड), साहेबराव कांबळे, गोपालभाऊ अग्रवाल, राजूभैय्या जयस्वाल, एडवोकेट संजय जाधव, प्रकाश राठोड, गजेंद्र ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

चौकट :- नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी सहभागी होऊन सामाजिक एकता जपण्याकरिता शिबिरामध्ये नाव नोंदणी करावी – रवींद्रभाऊ वाठोर.

या शिबिरामध्ये नाव नोंदण्याकरिता आकाश लोणकर मो.9403489272,अमोल मंडाले मो.8407941404, मनोज काळे सर मो.9730592256, रत्नदीप पाईकराव मो.7775077001 यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!