ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सावळी येथे जय्यत तयारी

मानवत / प्रतिनिधी प्रविण घागरे

मानवत (दिनांक १३ एप्रिल) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी जग भरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्या निमीत्त पुतळा परिसरात विद्युत रोषणाई सह आकर्षक सजावट करण्यात आली

असून आज मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिषबाजी करण्यात येणार आहे सजावटीची तयारी सद्या अंतिम टप्प्यात असून या साठी सावळी येथील मूकनायक मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
